एकाच वेळी एकाहून अधिक अॅप्समध्ये टास्कबद्दल मदत मिळवा
अॅप्ससह, तुम्ही आता तुमच्या Gmail मधून सारांश मिळवू शकता, Google Keep मध्ये तुमच्या किराणा मालाच्या सूचीत सहजपणे आयटम जोडू शकता, Google Maps वर तुमच्या मित्राच्या प्रवासासंबंधी टिपा तात्काळ प्लॉट करू शकता, YouTube Music वर कस्टम प्लेलिस्ट निवडू शकता आणि आणखी बरेच काही करू शकता.
तुमच्या ईमेलमध्ये योग्य माहिती शोधा
Gemini ला ठरावीक संपर्कांकडून आलेल्या ईमेलचा सारांश देण्यास किंवा तुमच्या इनबॉक्समध्ये विशिष्ट माहिती शोधण्यास सांगा.
नवीन संगीतावर थिरका
तुमची आवडती गाणी, कलाकार आणि प्लेलिस्ट प्ले करा, शोधा व डिस्कव्हर करा. Gemini ला कोणत्याही क्षणासाठी परिपूर्ण प्लेलिस्ट तयार करू द्या – जसे की २०२० पासूनच्या टॉप गाण्यांची निवडलेली प्लेलिस्ट.
तुमच्या दिवसाचे अधिक चांगले नियोजन करा
Gemini ला तुमचे कॅलेंडर संगतवार लावू द्या आणि इव्हेंटचा माग ठेवण्यात तुम्हाला मदत करू द्या. कॉन्सर्ट फ्लायरचा फोटो घ्या आणि त्या तपशिलांच्या आधारावर Gemini ला कॅलेंडर इव्हेंट तयार करण्यास सांगा.
विश्वासार्ह पाठ्यपुस्तकांमधील माहिती वापरा
राइस युनिव्हर्सिटीचा शैक्षणिक ना-नफा उपक्रम असलेल्या OpenStax सह Gemini हे शैक्षणिक पाठ्यपुस्तकांमधून माहिती मिळवू शकते. Gemini ला कोणत्याही संकल्पनेबद्दल किंवा विषयाबद्दल विचारा आणि सुसंबद्ध पाठ्यपुस्तकामधील आशयाच्या लिंक असलेले संक्षिप्त स्पष्टीकरण मिळवा.