कॉलेजचे विद्यार्थी एका वर्षासाठी विनामूल्य Pro प्लॅन वापरून १० लाख टोकनच्या संदर्भ विंडो अनलॉक करू शकतात. अधिक जाणून घ्या
Skip to main content

मोठ्या फाइल आणि कोड रीपॉझिटरी पहा

Pro मधील Gemini हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही चॅटबॉटहून अधिक माहितीचे विश्लेषण करू शकते. त्यामध्ये १० लाख टोकनची संदर्भ विंडो आहे, म्हणजेच ते कमाल १५०० पेजच्या मजकुरावर किंवा ३० हजार ओळींच्या कोडवर एकाच वेळी प्रक्रिया करू शकते.

गुंतागुंतीचे विषय समजून घ्या आणि अधिक स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा

एखाद्या विषयावरील सखोल संशोधन प्रबंधांचे आणि पाठ्यपुस्तकांचे एकाच वेळी विश्लेषण करा व तुमचा विशिष्ट अभ्यासक्रम आणि शिकण्याची शैली यांसाठी अनुकूल केलेल्या पद्धतीने मदत मिळवा. तुम्ही परीक्षेच्या आणि अभ्यासाच्या टिपादेखील जनरेट करू शकता.

असंख्य फाइलवर इनसाइट शोधा

ग्राहकांनी दिलेली हजारो परीक्षणे, सोशल मीडिया पोस्ट आणि सपोर्ट तिकिटे यांचे एकाच वेळी विश्लेषण करून ट्रेंड, अडथळे व नवीन गरजा ओळखण्यासाठी ग्राहकांच्या फीडबॅकचा सखोल अभ्यास करा. त्यानंतर, तुमच्या निष्कर्षांच्या आधारावर प्रेझेंटेशनसाठी तयार असलेले चार्ट तयार करा.

कोड अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि अमलात आणा

कमाल ३० हजार ओळींचा कोड अपलोड करा आणि Pro मधील Gemini ला संपादने सुचवणे, एरर डीबग करणे, मोठ्या प्रमाणावर परफॉर्मन्समधील बदल ऑप्टिमाइझ करण्यात मदत करणे आणि कोडचे वेगवेगळे भाग कसे काम करतात हे स्पष्ट करणे या गोष्टी करू द्या.