सादर करत आहोत Gemini, तुमचा नवीन वैयक्तिक AI असिस्टंट
गेल्या ८ वर्षांत, Google Assistant ने लाखो लोकांना फिरतीवर असताना त्यांच्या फोनवरून अनेक गोष्टी करण्यात मदत केली आहे. दरम्यान, आम्ही तुमच्याकडून ऐकले आहे की तुम्हाला तुमच्या Assistant कडून खूप काही हवे आहे— तुमच्यासाठी पर्सनलाइझ केलेला Assistant, ज्याच्याशी तुम्ही नैसर्गिकरीत्या बोलू शकता आणि ते तुम्हाला आणखी काही करण्यात मदत करू शकते. म्हणून आम्ही Google च्या सर्वात सक्षम AI मॉडेलसह तुमच्या फोनवर Assistant ची भूमिका पुन्हा नव्या रूपात आणली आहे.
हा एक नवीन प्रकारचा AI असिस्टंट आहे, जो भाषेचे प्रगत आकलन आणि कारणमीमांसा यासह तयार केला गेला आहे. Gemini हे Google Assistant सह तुम्हाला हवी असलेली हँड्स-फ्री मदत करू शकते, तसेच संभाषण आणि टास्कव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी करण्यात तुमची मदत करू शकते, याचा आम्हाला आनंद आहे. सोबतच चाचणीमध्ये आमच्या लक्षात आले, की लोकांची नैसर्गिक भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजण्याच्या क्षमतेमुळे Gemini ला अधिक यश मिळाले आहे.
Gemini ची Google Assistant शी तुलना कशी होते आणि ते तुम्हाला कशी मदत करू शकते, ते येथे आहे. Gemini ला शक्य तितका उपयुक्त आणि वैयक्तिक AI असिस्टंट बनवणे हे आमचे ध्येय आहे आणि आम्ही तुमच्या फीडबॅकच्या आधारे त्यामध्ये जलद सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही या सुधारणांसह हे पेज अपडेट करणार आहोत आणि अधिक बातम्यांसाठी तुम्ही नेहमी Gemini ची रिलीझ अपडेट तपासू शकता. कोणत्याही कारणास्तव Gemini आता तुमच्यासाठी उपयुक्त नसल्यास, तुम्ही सेटिंग्जमध्ये Google Assistant वर परत स्विच करू शकता. अधिक जाणून घ्या
Gemini ची Google Assistant सोबत तुलना
Gemini खरोखर काही आश्चर्यकारक गोष्टी करण्यास सक्षम आहे. कामे पूर्ण करण्यासाठी AI शी संवाद साधण्याच्या प्रक्रियेत Gemini मुळे आमूलाग्र बदल घडून आले आहेत. तुम्ही Gemini वापरण्यास सुरुवात करता, तेव्हा खालील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या:
-
Gemini ला नैसर्गिक भाषा समजू शकते, म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीप्रमाणेच त्याच्याशी बोलू किंवा लिहू शकता आणि Gemini ते समजून घेऊन प्रतिसाद देईल.
-
Gemini एका मोठ्या आणि अत्याधुनिक AI मॉडेलवर तयार केले आहे, याचा अर्थ काही प्रसंगांमध्ये साध्या विनंत्या Google Assistant पेक्षा जास्त वेळ घेऊ शकतात. यावर आम्ही सक्रियपणे काम करत आहोत. त्यामुळे Gemini अधिक वेगवान होईल, अशी आशा आहे.
-
Gemini हे Google Assistant पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे देऊ शकत असले, तरी Gemini नेहमीच बरोबर असेल असे नाही. तुम्ही आमच्या दोनदा तपासा वैशिष्ट्यासह Gemini चे प्रतिसाद तपासू शकता, Gemini ने त्याच्या अनेक प्रतिसादांमध्ये शेअर केलेल्या केलेल्या स्रोतांचे पुनरावलोकन करू शकता किंवा महत्त्वाच्या तथ्यांसाठी Google Search वापरू शकता.
आता उपलब्ध असलेल्या किंवा Gemini मध्ये लवकरच येणाऱ्या लोकप्रिय Google Assistant वैशिष्ट्यांची ही यादी आहे. कृपया लक्षात ठेवा, की हे फक्त तुमच्या फोनवर आणि इतर पात्र Android डिव्हाइसना लागू होते.
(Calendar, Keep आणि Tasks)
व्हिडिओबद्दल विचारा (YouTube)
(YouTube Music)
तुमचा फोन नियंत्रित करा (उदा. ॲप्स, वेबसाइट, कॅमेरा, सेटिंग्ज उघडा)
वैशिष्ट्य | Gemini उपलब्धता |
---|---|
(Calendar, Keep आणि Tasks) |
|
व्हिडिओबद्दल विचारा (YouTube) |
|
(YouTube Music) |
|
इतर मेसेजिंग ॲप्स
|
|
PDF बद्दल विचारा
(Gemini Advanced सह Android)
|
|
तुमचा फोन नियंत्रित करा (उदा. ॲप्स, वेबसाइट, कॅमेरा, सेटिंग्ज उघडा) |
|
एकत्रितपणे Gemini मध्ये सुधारणा करणे
आम्ही तुमच्या फीडबॅकवरून सतत शिकत आहोत आणि वेळोवेळी Gemini आणखी जलद आणि अधिक सक्षम बनवण्यासाठी काम करत आहोत, परंतु आम्ही नेहमीच सर्व गोष्टी योग्य प्रकारे करू असे नाही. आम्ही Gemini साठी नवीन रोमांचक क्षमता निर्माण करण्यावर काम करत असताना, जे Google Assistant वर अवलंबून आहेत अशांसाठी आम्ही दैनंदिन अनुभवाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत.
तुम्ही Gemini चा कोणताही प्रतिसाद थंब्स अप किंवा डाउन देऊन आमच्याबरोबर फीडबॅक शेअर करू शकता आणि नंतर तुमचे विचार मांडू शकता. आम्ही तुमचा फीडबॅक ऐकण्यासाठी उत्सुक आहोत.
निवडक डिव्हाइस आणि कंपॅटिबल खात्यांवर विशिष्ट भाषा आणि देशांमध्ये उपलब्ध वैशिष्ट्ये; कंपॅटिबल आशयासह काम करते. इंटरनेट कनेक्शन, Android डिव्हाइस आणि सेटअप आवश्यक आहे. अचूकतेसाठी प्रतिसाद तपासा.