Skip to main content

Nano Banana
Gemini मधील इमेज संपादन आता आणखी चांगले झाले आहे

तुम्ही स्वप्नात पाहू शकता अशा कोणत्याही जगात स्वतःला इमॅजिन करा. आमचे नवीनतम AI इमेज जनरेशन अपडेट, Nano Banana हे तुम्हाला एकाच फोटोचे रूपांतर असंख्य नवीन क्रीएशनमध्ये करू देते. तुम्ही सीन ब्लेंड करण्यासाठी किंवा कल्पना एकत्र करण्यासाठी एकाहून अधिक इमेजदेखील अपलोड करू शकता. आणि तुमच्या सूचना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊन तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणणे नेहमीपेक्षा सोपे झाले आहे.

Gemini इमेज संपादन अविश्वसनीय आहे

तुमचे फोटो एकत्र करा

अनेक घटक एकत्र करण्यासाठी आणि ते एकाच सीनमध्ये ब्लेंड करण्यासाठी तुम्ही एकाहून अधिक फोटो अपलोड करू शकता.

स्वतःला कुठेही इमॅजिन करा

स्वतःला वेगवेगळ्या ठिकाणी, पोशाखांमध्ये, हेअरस्टाइलमध्ये किंवा दशकांमध्येदेखील घेऊन जा.

तुमचे फोटो रीमिक्स करा

एका ऑब्जेक्टची शैली, रंग किंवा पोत ट्रान्सफर करून ती दुसऱ्या ऑब्जेक्टला लागू करा.

विशिष्ट संपादने करा

फक्त शब्द वापरून तुमच्या फोटोमधील विशिष्ट घटक सहजपणे संपादित करा. फोटो रिस्टोअर करा, बॅकग्राउंड बदला, विषय बदला आणि आणखी बरेच काही करा.

टायपोग्राफीच्या दृष्टीने…

Gemini चे इमेज संपादन अधिक अचूकतेने मजकूर रेंडर करते.

शब्दशः नवीन डायमेंशन मध्ये
प्रवेश करा.

काही सेकंदांमध्ये इमेज तयार करा

आमचे उच्च गुणवत्तेचे टेक्स्ट-टू-इमेज मॉडेल वापरून Gemini मध्ये आकर्षक इमेज तयार करा. तुमच्या कल्पना सहजतेने सुस्पष्ट तपशील आणि वास्तववादाने पुरेपूर भरलेल्या व्हिजुअलमध्ये रूपांतरित करा.

तुमचे मॅक्रो शॉट मिळवा

कोणत्याही शैलीमध्ये स्वप्न पहा

अवास्तव विश्व एक्सप्लोर करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. साध्या फॉर्म्युलापासून सुरुवात करा.<विषय> <कृती> <सीन> यांनुसार <इमेज तयार/जनरेट करा>  वापरून पहा आणि त्यानंतर तिथून पुढे तयार करायला सुरुवात करा. उदाहरणार्थ, "खिडकीच्या चौकटीवर सूर्यप्रकाशात झोपलेल्या मांजराची इमेज तयार कर."

  2. तुम्हाला जमतील तितके तपशील देऊन नेमका प्रॉम्प्ट तयार करा. तुमच्या डोक्यात येऊ शकतील तितके तपशील त्या प्रॉम्प्टमध्ये समाविष्ट असावेत. त्यामुळे, "लाल ड्रेसमधील स्त्रीची इमेज तयार कर" असे म्हणण्याऐवजी, "पार्कमध्ये धावणाऱ्या लाल ड्रेसमधील तरुण स्त्रीची इमेज तयार कर" असे म्हणून पहा. तुम्ही जितके जास्त तपशील द्याल, तितक्या चांगल्या पद्धतीने Gemini तुमच्या सूचना फॉलो करू शकेल.

  3. रचना, शैली आणि इमेजची गुणवत्ता विचारात घ्या. तुमच्या इमेजमधील घटक कसे मांडले जावेत (रचना), तुम्हाला कोणती व्हिजुअल शैली हवी आहे (शैली), इमेज गुणवत्तेची इच्छित पातळी (इमेज गुणवत्ता) आणि आस्पेक्ट रेशो (आकार) यांबद्दल विचार करा. “२:३ आस्पेक्ट रेशोमध्ये आणि ऑइल पेंटिंगच्या शैलीमध्ये अवकाशात उडणाऱ्या, धूसर, काटेरी साळिंदरीची इमेज जनरेट कर” असे काहीतरी वापरून पहा.

  4. सर्जनशीलतेशी मैत्री करा. अतिवास्तव वाटणाऱ्या वस्तू आणि युनिक सीन तयार करण्यात Gemini चा हातखंडा आहे. तुमच्या कल्पनाशक्तीचे वारू मोकाट सुटू द्या.

  5. तुम्हाला दिसत असलेली गोष्ट आवडत नसल्यास, ती बदलण्यासाठी फक्त Gemini ला तसे सांगा. आमचे इमेज संपादन मॉडेल वापरून, तुम्ही Gemini ला आधीच्या बॅकग्राउंडच्या जागी दुसरे बॅकग्राउंड टाकण्यास, एखादा ऑब्जेक्ट बदलण्यास किंवा एखादा घटक जोडण्यास सांगून तुमच्या इमेजचे नियंत्रण घेऊ शकता – हे सर्व करत असताना तुम्ही त्या इमेजमधील तुम्हाला आवडलेले तपशील कायम ठेवू शकता.

Gemini अ‍ॅप उपलब्ध असलेल्या सर्व भाषांमध्ये आणि देशांमध्ये AI इमेज जनरेशन उपलब्ध आहे.

AI तत्त्वे यांच्याशी सुसंगत पद्धतीने हा AI इमेज जनरेटर जबाबदारीने डिझाइन केला गेला आहे. आणि Gemini वापरून तयार केलेली व्हिजुअल व मानवाने तयार केलेली मूळ कलाकृती यांमध्ये स्पष्ट फरक आहे याची खात्री करण्यासाठी, ती व्हिजुअल AI द्वारे जनरेट केलेली आहेत हे दाखवण्याकरिता Gemini मध्ये दिसणारा वॉटरमार्क, तसेच न दिसणारा SynthID वॉटरमार्क वापरला जातो.

Gemini ची आउटपुट प्रामुख्याने वापरकर्ता प्रॉम्प्टद्वारे निर्धारित केली जातात आणि कोणत्याही जनरेटिव्ह AI टूलमध्ये होऊ शकते त्याप्रमाणे काही व्यक्तींना आक्षेपार्ह वाटणारा आशय जनरेट होऊ शकतो. आम्ही थंब्स अप/डाउन बटणांद्वारे तुमचा फीडबॅक ऐकणे सुरू ठेवू आणि सातत्याने सुधारणा करत राहू. अधिक तपशिलांसाठी, तुम्ही आमच्या वेबसाइटवर आमच्या दृष्टिकोनाबद्दल वाचणे हे करू शकता.

एक्सप्लोर करत रहा