Gemini Live
Gemini सह लाइव्ह बोला Gemini Live1 हा Gemini सोबत चॅट करण्याचा अगदी स्वाभाविक मार्ग आहे. विचारविनिमय करण्यासाठी लाइव्ह जा आणि तुमचे विचार संगतवार लावा अथवा तुमचा कॅमेरा किंवा स्क्रीन शेअर करा आणि रीअल टाइम बोललेले प्रतिसाद मिळवा. ४५ हून अधिक भाषांमध्ये आणि १५० हून अधिक देशांमध्ये मोबाइल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
तुम्हाला दिसेल त्या कोणत्याही गोष्टीबद्दल Gemini शी बोला
तुम्ही पाहत असलेल्या, तुमच्या आजूबाजूला असलेल्या किंवा तुमच्या स्क्रीनवरील कोणत्याही गोष्टीबद्दल आता तुम्ही Gemini सोबत संभाषण करू शकता.
व्हिडिओ
आता तुम्ही तुमच्या फोनचा कॅमेरा शेअर करून तुम्ही पाहत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल मदत मिळवू शकता. तुमच्या खोलीतल्या लहानश्या कोपऱ्यात जास्तीत जास्त सामान कसे राहील, रात्री पार्टीसाठी बाहेर जाताना कोणते कपडे घालावेत किंवा कॉफी मशीन कसे दुरुस्त करावे याचे पायरीनिहाय मार्गदर्शन याबद्दल विचारा.
स्क्रीनशेअर
तुमच्या स्क्रीनवरील कोणत्याही गोष्टीसाठी त्वरित मदत मिळवा. तुमच्या पुढील पोस्टसाठी योग्य फोटो निवडणे, नवीन पर्स कशी दिसते आहे याबद्दल सेकंड ओपिनियन घेणे किंवा तुमच्या फोनमधील सेटिंग्ज मेनूबद्दल विचारणे यांसाठी Gemini सोबत तुमची स्क्रीन शेअर करा.
स्वाभाविकपणे चॅट करा
मोठ्याने बोलून विचारविनिमय करण्यासाठी लाइव्ह जा. Gemini तुमच्या संभाषणपर शैलीशी जुळवून घेते, त्यामुळे तुम्ही वाक्याच्या मध्येच तुमचा विचार बदलू शकता, फॉलो-अप प्रश्न विचारू शकता आणि सहजपणे मल्टी-टास्किंग करू शकता. हस्तक्षेप करायचा आहे किंवा विषय बदलायचा आहे का? Gemini Live सहजपणे तुम्हाला हव्या त्या दिशेने संभाषण वळवू शकते.
तुमच्या कुतूहलाला चालना द्या
प्रेरणा मिळेल तसे त्वरित शिकणे अनलॉक करा - तुम्ही आगामी ट्रिपसाठी फ्रेंचचा सराव करत असाल, मुलाखतीची तयारी करत असाल किंवा खरेदी करताना सल्ला हवा असेल. तुमची कौशल्ये सुधारित करा, नवीन विषय एक्सप्लोर करा आणि Gemini च्या थोड्याशा मदतीने कल्पनांवर सहयोग करा. उपयुक्त मार्गदर्शक आणि क्रीएटिव्ह भागीदार तुमच्यासाठी अगदी सहज उपलब्ध असल्याचा अनुभव घ्या.
फक्त मजकूर स्वरूपातील प्रतिसादांवर समाधान मानू नका
तुमच्या संभाषणांमध्ये संदर्भ आणा. तुम्ही काय पाहत आहात, कशावर काम करत आहात हे शेअर करा आणि Gemini तुमच्या गरजेनुसार साहाय्य व इनसाइट पुरवेल. तुम्ही वाचत असलेल्या लेखाबद्दल प्रश्न विचारण्यापासून ते प्रोजेक्टविषयी पायरीनिहाय मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुमचा कॅमेरा शेअर करण्यापर्यंत, तुम्ही काय पाहत आहात यामध्ये Gemini ला रूची आहे आणि ते अधिक समृद्ध, अधिक डायनॅमिक संभाषणे तयार करण्यासाठी सज्ज आहे.
कनेक्ट केलेली अॅप्स
Google Maps, Calendar, Tasks आणि Keep पासून सुरू करत Gemini Live हे तुम्ही दररोज वापरत असलेल्या अॅप्ससोबत इंटिग्रेट करते. विचारविनिमय करा, नियोजन करा आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबाबत अप टू डेट रहा, तेही स्वाभाविक आणि संभाषणपर पद्धतीने.
एक्सप्लोर करत रहा
- 1.
अचूकतेसाठी प्रतिसाद तपासा. ठरावीक वैशिष्ट्ये आणि खात्यांसोबत कंपॅटिबल आहे. इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. निवडक डिव्हाइसवर आणि निवडक देशांमध्ये, भाषांमध्ये व १८ वर्षांहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.