सादर आहे
Nano Banana 2.
Nano Banana च्या मदतीने तुमच्या सर्वात भन्नाट कल्पनांना हव्या त्या वेगाने आणि गुणवत्तेने प्रत्यक्षात आणा. विनामूल्य उपलब्ध. वर्धित गुणवत्ता, कारणमीमांसा आणि व्हिजुअल डिझाइन असलेले आमचे सर्वात प्रगत इमेज मॉडेल Nano Banana 2.1 अनलॉक करण्यासाठी Google AI प्लॅनवर अपग्रेड करा.
Nano Banana वापरूनप्रत्येक तपशील नेमका द्या
तुमच्या इमेजची व्हाइब पूर्णपणे बदला. सूर्यप्रकाशित दिवसापासून मूडी रात्री़पर्यंत, परिपूर्ण दृश्य मिळवण्यासाठी कॅमेराचे वेगवेगळे अँगल वापरून पहा आणि तुमचा विषय उठावदार करण्यासाठी फोकस अॅडजस्ट करा.
शैली काही सेकंदांमध्ये लागू होते.
तुमच्या इमेजचे स्वरूप रीइमॅजिन करा. कोणत्याही संदर्भ फोटोमधून पोत, रंग किंवा शैली घ्या आणि ती तुमच्या विषयावर लागू करा. शून्यापासून सुरुवात न करता विविध सौंदर्यशास्त्रांचा वापर करून प्रयोग करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
एक व्हिजुअल, अनेक आकार.
तुम्ही तुमच्या निर्मिती जिथे शेअर करता, तिथे त्या व्यावसायिक वाटू द्या. तुम्हाला आवश्यक असलेल्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये बसण्यासाठी त्यांचा आकार झटपट बदला – हे सर्व तुमच्या आवडीचे तपशील क्रॉप न करता करा.
तुमचे शब्द, अगदी योग्य ठिकाणी आहेत.
स्पष्ट मजकूर वापरून लोगो, आमंत्रणे, पोस्टर, कॉमिक आणि तुम्हाला हवे असलेले काहीही तयार करा. अनेक भाषांमध्ये, शब्द तुमच्या निर्मितीमध्ये योग्यरीत्या बसतात.
तुमच्या आवश्यकतांनुसार योग्य मॉडेल निवडा
इमेज जनरेशन आणि संपादन करणारे मॉडेल
इमेज जनरेशन आणि संपादन करणारे आमचे सर्वाेत्कृष्ट मॉडेल
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Gemini अॅप उपलब्ध असलेल्या सर्व भाषांमध्ये आणि देशांमध्ये AI इमेज जनरेशन उपलब्ध आहे.
-
Nano Banana अॅक्सेस करण्यासाठी, टूल मेनूमधून "🍌इमेज तयार करा" निवडा. त्यानंतर, संपादित करण्यासाठी प्रॉम्प्ट जोडा किंवा इमेज अपलोड करा.
-
Google AI Pro, Plus आणि Ultra वापरकर्त्यांना आमचे सर्वोत्तम इमेज मॉडेल, Nano Banana 2.1 वापरता येईल. तसेच, थ्री डॉट मेनूवर जाऊन “Pro वापरून पुन्हा करा” निवडून ते Nano Banana Pro च्या मदतीने इमेज पुन्हा जनरेट करू शकतात.
-
साध्या फॉर्म्युलापासून सुरुवात करा.<विषय> <कृती> <सीन> यांनुसार <इमेज तयार/जनरेट करा> वापरून पहा आणि त्यानंतर तिथून पुढे तयार करायला सुरुवात करा. उदाहरणार्थ, "खिडकीच्या चौकटीवर सूर्यप्रकाशात झोपलेल्या मांजराची इमेज तयार कर."
-
तुम्हाला जमतील तितके तपशील देऊन नेमका प्रॉम्प्ट तयार करा. तुमच्या डोक्यात येऊ शकतील तितके तपशील त्या प्रॉम्प्टमध्ये समाविष्ट असावेत. त्यामुळे, "लाल ड्रेसमधील स्त्रीची इमेज तयार कर" असे म्हणण्याऐवजी, "पार्कमध्ये धावणाऱ्या लाल ड्रेसमधील तरुण स्त्रीची इमेज तयार कर" असे म्हणून पहा. तुम्ही जितके जास्त तपशील द्याल, तितक्या चांगल्या पद्धतीने Gemini तुमच्या सूचना फॉलो करू शकेल.
-
रचना, शैली आणि इमेजची गुणवत्ता विचारात घ्या. तुमच्या इमेजमधील घटक कसे मांडले जावेत (रचना), तुम्हाला कोणती व्हिजुअल शैली हवी आहे (शैली), इमेज गुणवत्तेची इच्छित पातळी (इमेज गुणवत्ता) आणि आस्पेक्ट रेशो (आकार) यांबद्दल विचार करा. “२:३ आस्पेक्ट रेशोमध्ये आणि ऑइल पेंटिंगच्या शैलीमध्ये अवकाशात उडणाऱ्या, धूसर, काटेरी साळिंदरीची इमेज जनरेट कर” असे काहीतरी वापरून पहा.
-
सर्जनशीलतेशी मैत्री करा. अतिवास्तव वाटणाऱ्या वस्तू आणि युनिक सीन तयार करण्यात Gemini चा हातखंडा आहे. तुमच्या कल्पनाशक्तीचे वारू मोकाट सुटू द्या.
-
तुम्हाला दिसत असलेली गोष्ट आवडत नसल्यास, ती बदलण्यासाठी फक्त Gemini ला तसे सांगा. आमचे इमेज संपादन मॉडेल वापरून, तुम्ही Gemini ला आधीच्या बॅकग्राउंडच्या जागी दुसरे बॅकग्राउंड टाकण्यास, एखादा ऑब्जेक्ट बदलण्यास किंवा एखादा घटक जोडण्यास सांगून तुमच्या इमेजचे नियंत्रण घेऊ शकता – हे सर्व करत असताना तुम्ही त्या इमेजमधील तुम्हाला आवडलेले तपशील कायम ठेवू शकता.
AI तत्त्वे यांच्याशी सुसंगत पद्धतीने हा AI इमेज जनरेटर जबाबदारीने डिझाइन केला गेला आहे. आणि Gemini वापरून तयार केलेली व्हिजुअल व मानवाने तयार केलेली मूळ कलाकृती यांमध्ये स्पष्ट फरक आहे याची खात्री करण्यासाठी, ती व्हिजुअल AI द्वारे जनरेट केलेली आहेत हे दाखवण्याकरिता Gemini मध्ये दिसणारा वॉटरमार्क, तसेच न दिसणारा SynthID वॉटरमार्क वापरला जातो.
Gemini ची आउटपुट प्रामुख्याने वापरकर्ता प्रॉम्प्टद्वारे निर्धारित केली जातात आणि कोणत्याही जनरेटिव्ह AI टूलमध्ये होऊ शकते त्याप्रमाणे काही व्यक्तींना आक्षेपार्ह वाटणारा आशय जनरेट होऊ शकतो. आम्ही थंब्स अप/डाउन बटणांद्वारे तुमचा फीडबॅक ऐकणे सुरू ठेवू आणि सातत्याने सुधारणा करत राहू. अधिक तपशिलांसाठी, तुम्ही आमच्या वेबसाइटवर आमच्या दृष्टिकोनाबद्दल वाचणे हे करू शकता.
फक्त Gemini अॅपवर इमेज अपलोड करा आणि ती Google AI ने जनरेट केली आहे का हे विचारा. ही पडताळणी SynthID द्वारे सक्षम केलेली आहे, जे आमचे डिजिटल वॉटरमार्किंग तंत्रज्ञान आहे. हे सध्या इमेज, ऑडिओ आणि व्हिडिओसाठी उपलब्ध आहे.
आम्ही SynthID सह AI आशयामधील पारदर्शकता कशी वाढवत आहोत याबद्दल आमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता.
कंपॅटिबिलिटी आणि उपलब्धता वेगवेगळी असते. मर्यादा लागू. १८+.