Lyria 3.5
कोणत्याही क्षणासाठी कस्टम ट्रॅक तयार करा
प्ले करण्याचा नवीन मार्ग. Gemini चे सर्वोत्तम वाटणारे AI संगीत मॉडेल Lyria 3.5 अनुभवा. समृद्ध गायन आणि वाद्य यांसह मजकुराचे किंवा फोटोचे पूर्ण ट्रॅकमध्ये रूपांतर करा. विशिष्ट भावना, फोटो किंवा मूडचे तुमच्या परिपूर्ण साउंडट्रॅकमध्ये रूपांतर करणे इतके सोपे कधीच नव्हते.
तयार करा, ऐका, शेअर करा.
Gemini ला साध्या प्रॉम्प्टचे रूपांतर तुमच्या शैलीला अनुरूप नव्याकोऱ्या गाण्यात करायला सांगा. विविध जॉनर, मूड आणि काळातील संगीताचा मिलाफ असलेले ट्रॅक तयार करा, जे एकाग्रतेसाठी, खास प्रसंगी उत्साह वाढवण्यासाठी, गट चॅटमध्ये शेअर करता येण्यायोग्य एखादे स्तुतिगीत म्हणून वापरण्यासाठी योग्य असतील.
नवीन आवाज. नवीव नियंत्रणे.
तुमचा आवाज निवडा, टेंप्लेटपासून सुरुवात करा आणि Lyria च्या नवीनतम वैशिष्ट्यांसह अधिक दीर्घ, अधिक समृद्ध ट्रॅक तयार करा.
व्होकल वि. वाद्यसंगीत
तुमच्या ट्रॅकला स्वतःची लय देण्यासाठी व्होकल किंवा इन्स्ट्रुमेंटल निवडा.
जॉनरची निवड
तुम्ही शोधत असलेला नेमका आवाज आणि शैली मिळवण्यासाठी जॉनरची विस्तृत श्रेणी एक्सप्लोर करा.
ट्रॅकची कमाल लांबी ३ मिनिटे
तीन मिनिटांपर्यंतच्या ट्रॅकसह तुमच्या कल्पनांना मनसोक्त थिरकू द्या.
टेंप्लेटसह सुरुवात करा
योग्य टेंप्लेटसह सुरुवात करण्यासाठी Lyria च्या टेंप्लेट गॅलरीमध्ये जा. ट्रॅक निवडा, तपशील ट्वीक करा आणि Gemini ला त्याचे रूपांतर हाय-फायडेलिटी साउंडट्रॅकमध्ये करताना पहा.
ट्रॅक वापरून ते व्यक्त करा
व्हाइब टाइप करा. बीट मिळवा. आपापसातील विनोदांपासून तुमच्या नवीन वैयक्तिक अँथमपर्यंत, तुम्हाला काय ऐकायचे आहे याचे वर्णन करा आणि Gemini तुमच्या प्रॉम्प्टचे रूपांतर पर्सनलाइझ केलेल्या, शेअर करण्यायोग्य ट्रॅकमध्ये करण्यासाठी बाकीचे हँडल करते.
तुमच्या कॅमेरा रोलला साउंडट्रॅक द्या
तुमचे आवडते मीम किंवा आठवण शेअर करण्यायोग्य मनोरंजनामध्ये बदला. फक्त फोटो अपलोड करा आणि भावनांना पूर्णपणे साजेसा कस्टम ट्रॅक कंपोझ करण्यासाठी Gemini त्या दृश्याचे विश्लेषण करेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Lyria 3.5 हे आमचे आतापर्यंतचे सर्वोत्तम वाटणारे AI संगीत मॉडेल वापरून ३ मिनिटांपर्यंतचे उच्च गुणवत्तेचे ट्रॅक तयार करा. तुमची वैयक्तिक शैली दाखवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ट्रॅक कस्टमाइझ करू देणारी वर्धित क्रीएटिव्ह नियंत्रणे यांसह, सुधारित गीतांचा दर्जा आणि अधिक समृद्ध गाणी अनुभवा.
Gemini अॅपसह, प्रत्येक ट्रॅक Nano Banana ने तयार केलेल्या कस्टम कव्हर आर्टसह येतो. तुमचा ट्रॅक पूर्ण झाल्यावर, तुम्ही तो सहजपणे डाउनलोड करू शकता किंवा तुमच्या आवडत्या प्लॅटफॉर्मवर थेट मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता.
जेमिनी अॅप उपलब्ध असलेल्या सर्व देशांमध्ये एआय म्युझिक जनरेशन उपलब्ध आहे. अनुभवाचा आनंद घेण्यासाठी तुमचे वय १८ वर्षांहून अधिक असणे आवश्यक आहे.
आमची AI तत्त्वे यांच्याशी सुसंगत राहून, Gemini अॅपमध्ये जनरेट केलेले सर्व ट्रॅक हे Google AI द्वारे जनरेट केलेला आशय ओळखण्यासाठी आमचा न दिसणारा वॉटरमार्क SynthID यासह एंबेड केलेले आहेत.
तुम्हाला AI आशय ओळखण्यात मदत करण्यासाठी आम्ही आणखी टूलदेखील देत आहोत, तसेच ऑडिओचा समावेश करण्यासाठी आमच्या पडताळणी क्षमतांचा विस्तार करत आहोत. फक्त फाइल अपलोड करा आणि ती Google AI वापरून जनरेट केली आहे का हे विचारा. Gemini मग SynthID तपासेल आणि प्रतिसाद देण्यासाठी स्वतःची कारणमीमांसा वापरेल.
Gemini च्या AI संगीत जनरेटरचा पुरेपूर वापर करण्यासाठी, तुमच्या प्रॉम्प्टमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि तुमचे गाणे उत्तम व्हावे यासाठी या गोष्टींचा समावेश करा:
-
जॉनर आणि काळ: विशिष्ट जॉनर, युनिक मिक्स किंवा सांगितिक युग यांचा प्रामुख्याने वापर. (उदा. ८० च्या दशकातील सिंथ-पॉप, मेटल आणि रॅपचे फ्यूजन, इंडी फोक, ओल्ड कंट्री)
-
टेम्पो आणि लय: ऊर्जा सेट करा आणि बीट कशी वाटते याचे वर्णन करा. (उदा.: उत्साहवर्धक आणि नृत्य करण्यासाठी योग्य, स्लो बॅलड, जोशपूर्ण बीट)
-
वाद्ये: तुमचा ट्रॅक उठावदार करण्यासाठी विशिष्ट आवाजाचा किंवा एखाद्या वाद्याचा वापर करायला सांगा. (उदा.: सॅक्सोफोन सोलो, डिस्टॉर्टेड बेसलाइन, फझी गिटार)
-
गायन: सर्वोत्तम आउटपुटसाठी लिंग, आवाजाचा पोत (टिंबर) आणि रेंज नमूद करा. (उदा.: एअरी फीमेल सोप्रानो, डीप मेल बॅरिटोन, रास्पी रॉकर)
-
गाण्याचे बोल: विषयाचे वर्णन करा, त्यात पर्सनलाइझ केलेले तपशील समाविष्ट करा किंवा स्ट्रक्चर टॅगसह तुमचा स्वतःचा मजकूर द्या. (उदा.: “एका भन्नाट वीकेंडविषयी” कस्टम: [पद्य १], एकाच शब्दाची मंत्रासारखी पुनरावृत्ती)
तुम्ही या सगळ्या गोष्टी एकत्र करून असे काही तयार करू शकता:
आरामदायी, डोलायला लावणारी बीट असलेले इंडी लोकसंगीत. ट्रॅकमध्ये ड्राय, इंटिमेट अकॉस्टिक गिटार, पियानोचे कोमल स्वर आणि हलका पर्कशन आहे. ढगाळ वातावरणात मी माझ्या कुत्र्याला फिरायला घेऊन जात आहे अशा आशयाचे महिलेच्या कोमल, शांत स्वरातील गाण्याचे बोल.
मर्यादा लागू. कंपॅटिबिलिटी बदलते. १८+. जबाबदारीने तयार करा.