Skip to main content

सादर आहे Chrome मधील Gemini

AI साहाय्य, थेट तुमच्या ब्राउझरमध्ये.

तुम्ही जिथे आहात, तिथेच तुमच्यासोबत काम करणारी इंटेलिजन्स सिस्टीम.

महत्त्वाचे टेकअवे मिळवा, संकल्पना स्पष्ट करा आणि तुमच्या उघडलेल्या टॅबच्या संदर्भावर आधारित उत्तरे शोधा.

आवश्यक गोष्टी झटपट समजून घ्यायच्या आहेत का? Gemini हे लेख, पेज किंवा थ्रेडचे संक्षिप्त सारांश थेट तुमच्या ब्राउझरमध्ये डिलिव्हर करते, जेणेकरून तुम्हाला मुख्य मुद्दे झटपट समजतात.

तुम्ही जे वाचत आहात त्याबद्दल प्रश्न आहे का? Gemini ला विचारा. तुम्हाला लक्ष केंद्रित केलेले ठेवण्यात मदत करण्यासाठी, सुसंबद्ध उत्तरे आणि स्पष्टीकरणे देण्याकरिता ते तुमच्या उघडलेल्या टॅबचा संदर्भ वापरते.

साध्या स्पष्टीकरणांपेक्षा जास्त मिळवा. तुम्ही गहन विषयांचा किंवा नवीन संकल्पनांचा अभ्यास करत असताना, Gemini ला फक्त गोंधळात टाकणारे भाग स्पष्ट करण्यास सांगू नका, तर त्यासोबतच ते साहित्य समजून घेताना सक्रीय मदत करण्यास सांगा.

उत्पादनांविषयी संशोधन करत आहात की पर्याय विचारात घेत आहात? Gemini ला पेजवरून महत्त्वाची माहिती, तपशील किंवा फायदे आणि तोटे मिळवण्यास सांगा, ज्यामुळे तुम्हाला स्पष्टता आणि सुलभतेसह माहितीपूर्ण निवड करण्यात मदत होईल.

विचारविनिमय करायचा आहे, विचार संगतवार लावायचे आहेत किंवा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करायचा आहे? Gemini Live सोबत सहजरीत्या चॅट करा आणि बोलून उत्तरे मिळवा, सर्व काही Chrome मध्ये.

तुमच्या काँप्युटरप्रमाणेच, तुम्ही काय वाचत आहात याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मोबाइलवरील Gemini उपलब्ध आहे. Android वर ते Chrome सह तुमच्या स्क्रीनवरील कोणत्याही गोष्टीसोबत काम करते. तर लवकरच iOS वर येत असलेले Gemini हे थेट Chrome अ‍ॅपमध्ये बिल्ट केलेले असेल.

तुमची वेब, तुमचे नियंत्रण

Chrome मधील Gemini तुमच्यासोबत, तुमच्या अटींनुसार काम करते. तुम्ही विचारता, तेव्हाच ते मदत करते, ज्यामुळे तुम्हीच नियंत्रक असता.

तुम्ही तयार असाल तेव्हा मी ही असेन

तुम्ही Gemini आयकनवर किंवा तुम्ही सेट केलेल्या कीबोर्ड शॉर्टकटवर क्लिक करून ते वापरणे निवडता, तेव्हाच Chrome मधील Gemini ॲक्टिव्हेट होते. तुम्ही सांगाल, तेव्हाच मदत करते.

तुमच्या पद्धतीने मदत मिळवा

Chrome मधील Gemini वापरून तुमच्या पद्धतीने मदत मिळवा. तुमचा प्रश्न नैसर्गिकरीत्या बोला किंवा टाइप करा आणि Gemini आशय झटपट समजून घेण्यात अथवा कंटाळवाणी कामे पूर्ण करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी पेजचा आशय वापरू शकते.

तुमची अ‍ॅक्टिव्हिटी सहजपणे व्यवस्थापित करा

तुमची अ‍ॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करणे, हटवणे आणि बंद करणे यांसाठी तुम्ही तुमची Gemini अ‍ॅप्स अ‍ॅक्टिव्हिटी कधीही अ‍ॅक्सेस करू शकता.

वेब नवीन रूपात.

Chrome मधील Gemini सह, तुमच्या ब्राउझरमध्ये थेट AI साहाय्य असल्याने टॅब स्विच करण्याची आवश्यकता नाही. यामुळे तुम्हाला आशय झटपट समजून घेण्यात किंवा तुमच्या उघडलेल्या टॅबचा संदर्भ वापरून टास्क पूर्ण करण्यात मदत होते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Chrome मधील Gemini वैशिष्ट्यामुळे महत्त्वाचे टेकअवे मिळवणे, संकल्पना स्पष्ट करणे, उत्तरे शोधणे आणि यासारख्या आणखी बऱ्याच गोष्टी सहजपणे करण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्राउझरवरून AI साहाय्य मिळवू शकता. सर्वात सुसंबद्ध प्रतिसाद देण्यासाठी, Chrome मधील Gemini तुमच्या उघडलेल्या टॅबचा संदर्भ वापरते. 

Chrome मधील Gemini हा डेस्कटॉपवरील Chrome ब्राउझरचा भाग आहे आणि gemini.google.com येथे कोणत्याही ब्राउझरमध्ये Gemini ला भेट देणे किंवा Chrome मधील अ‍ॅड्रेस बारमध्ये @gemini टाइप करून Gemini वेब अ‍ॅपसोबत चॅट सुरू करणे यांपेक्षा वेगळे आहे. तुम्ही इतर ब्राउझरमध्ये (किंवा Chrome च्या आशय क्षेत्रामध्ये) Gemini वेब अ‍ॅप वापरू शकता, पण तुम्ही पेजचा आशय शेअर करू शकणार नाही किंवा Chrome मधील Gemini सह करू शकता तसा लाइव्ह मोड वापरू शकणार नाही.

तुम्ही Chrome टूलबारमधील Gemini आयकनद्वारे किंवा Windows अथवा Mac डेस्कटॉपवर तुम्ही सेट केलेल्या कीबोर्ड शॉर्टकटद्वारे Chrome मधील Gemini अ‍ॅक्सेस करू शकता.

Android वरील Chrome आणि इतर अ‍ॅप्स वापरताना, तुम्ही पॉवर बटण धरून ठेवूनदेखील Gemini अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. आणि लवकरच, iOS वर Chrome मधील Gemini हे अ‍ॅपमध्ये बिल्ट केलेले येईल, ज्याचा अ‍ॅक्सेस Chrome omnibox द्वारे असेल.

Chrome ची भाषा इंग्रजीवर सेट केलेल्या यूएसमधील सर्व पात्र Mac आणि Windows वापरकर्त्यांसाठी Chrome मधील Gemini हे रोल आउट होत आहे. आम्ही लवकरच हे वैशिष्ट्य आणखी लोकांपर्यंत आणि अतिरिक्त भाषांमध्ये आणण्यास उत्सुक आहोत.

iOS वरील Chrome मधील Gemini हे त्यांची Chrome भाषा इंग्रजीवर सेट केलेल्या यूएसमधील पात्र iPhone वापरकर्त्यांसाठी लवकरच येत आहे.

प्रतिसाद तपासा. सेटअप आवश्यक आहे. कंपॅटिबिलिटी आणि उपलब्धता वेगवेगळी असते. १८+